​सचिन तेंडूलकर आणि पंडित भीमसेन जोशी

​सचिन तेंडूलकर एकदा काही खाजगी कामाकरता मुंबैहून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून सचिनला म्हणाले,

“नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!”

त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की ‘मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!’

राक्षस-योग! 

पार्ल्याची पहाट. संगीतकार वसंत देसाई थकूनभागून चालले होते. त्यांना वाटेत पु. ल. देशपांडे भेटले. यावेळचा त्यांचा संवाद: 

पुलंनी विचारले, ‘पहाटे कुठे?’ 

देसाई उत्तरले, ‘अहो, आत्ता येतोय. स्टुडिओतून’ 

‘ रात्रभर काम?’ 

‘ हो ना. गाण्याचं रेकॉडिर्ंग चालू होतं ना.’ 

‘ कुठली फिल्म?’ 

‘ स्वयंवर झाले सीतेचे.’ 

‘ आणि गाणं?’ 

‘ अहो, गाणं तर राक्षसाच्या तोंडचं होतं.’ 

‘ कुठलं?’ 

‘ अहो, रावणाच्या तोंडी. ‘रम्य ही स्वर्गाहुनि लंका.’ 

‘ गायलं कुणी?’ 

‘ अहो, आपले भीमसेन जोशी.’ 

‘ हां. मग बरोबर आहे. राक्षसाच्या गाण्याला ‘राक्षस’च पाहिजे.’ 

पु.लंचे उत्तर

हा किस्सा पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य पंडित उपेंद भट यांनी एका मैफलीत सांगितला होता.

पं.भीमसेन जोशी यांचे संगीताबद्दलचे अथांग ज्ञान, त्यांनी केलेली खडतर संगीतसाधना, मोठमोठ्या लोकांबरोबर झालेल्या भेटी, जगाचा मोठा अनुभव व त्यातून केलेले मार्मिक निरीक्षण आणि शिवाय त्यांचा हजरजबाबीपणा याने त्यांची मुलाखतसुध्दा श्रवणीय होते. “मी (कै.)यशवंतरावांना सांगितलं की तुम्हाला ते दर पांच वर्षांनी इलेक्शनला उभं रहावं लागतंय् की नै बघा, पण माझं इलेक्शन एकदाच त्या भगवंताने करून सोडलं आहे.” असे त्यांनी एकदा एका मुलाखतीत गंमतीने सांगितले होते.

आज ०४ फेब्रुवारी 

आज मा भीमसेन जोशी यांचा जन्मदिन

आपल्या समूहाकडून मा. भीमसेन जोशी यांना आदरांजली. भीमसेनीगाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा- यमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीलाधरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s